विशेष वृत्त: निवडणूक आयोगातर्फे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR 2026) मोहीम वेगाने सुरू आहे. अनेक नागरिकांनी आपले SIR फॉर्म भरून परिसराच्या BLO (Booth Level Officer) कडे जमा केले आहेत. परंतु, तुमचा फॉर्म BLO द्वारे ऑनलाईन सिस्टीमवर अपडेट (Submit) झाला आहे की नाही, याबद्दल चिंता आहे? आता तुम्ही स्वतः मोबाईलवरून किंवा संगणकावरून ऑनलाईन स्टेटस तपासू शकता.
निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या अधिकृत नागरिका सेवा पोर्टलवर (Citizen Service Portal) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
फॉर्म स्टेटस तपासण्याची व ऑनलाईन सबमिट करण्याची सोपी पद्धत:
१. पोर्टल उघडा व लॉगिन करा:
- सर्वप्रथम voters.eci.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- स्क्रीनवर दिसणाऱ्या 'Fill Enumeration Form' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर आणि दिलेला कॅप्चा (Captcha) टाकून 'Request OTP' वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करा.
२. राज्याची निवड व मतदार ओळखपत्र प्रविष्ट करा:
- लॉगिन झाल्यानंतर State (राज्य) या यादीतून 'Maharashtra' हा पर्याय निवडा.
- तुमचा Voter ID (EPIC Number) टाकून सबमिट / सर्च करा.
३. सर्च केल्यानंतर काय दिसेल?
- (फॉर्म आधीच सबमिट झाला असल्यास): जर BLO ने तुमचा फॉर्म ऑनलाईन अपडेट केला असेल, तर स्क्रीनवर "Your Enumeration Form has already been submitted by BLO" असा मेसेज किंवा स्टेटस अपडेट दिसेल. असा मेसेज आल्यास तुमचा फॉर्म यशस्वीरीत्या ऑनलाईन जमा झाला आहे हे स्पष्ट होते.
४. जर असा मेसेज आला नाही काय ???
- फॉर्म सबमिट झाला नसल्यास तुम्ही BLO सोबत संपर्क साधून फॉर्म सबमिट करण्यासंदर्भात चर्चा करा.
फॉर्म सबमिट झाला नसल्यास - स्वतः कसा भरावा?)
जर BLO कडून अजून फॉर्म सबमिट झाला नसेल, तर तुमच्यासमोर प्री-फिल्ड (Pre-filled) फॉर्म उघडेल. तो तुम्ही स्वतः खालीलप्रमाणे पूर्ण करू शकता:
OTP प्रमाणीकरण: Voter ID शी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून Verify करा.
पर्याय (Category) निवडा: जुन्या SIR यादीतील तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्या नावाच्या नोंदीनुसार योग्य पर्याय निवडा.
तपशील भरा: जुन्या नोंदीनुसार विचारलेली माहिती व नातेवाईकांचा तपशील प्रविष्ट करा.
Preview & Aadhaar e-Sign: भरलेली माहिती Preview करून तपासा आणि शेवटी आधार कार्ड क्रमांकाद्वारे e-Sign (OTP प्रमाणीकरण) करून फॉर्म पूर्ण करा.
महत्त्वाची टीप: जर तुमचा ऑनलाईन फॉर्म सबमिट झालेला नसेल आणि तुम्हाला स्वतः भरताना काही अडचण येत असेल, तर त्वरित तुमच्या परिसराच्या BLO (Booth Level Officer) शी संपर्क साधून ऑनलाईन नोंदीची खात्री करून घ्यावी.

