इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट, इंदापूर संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, इंदापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण, शांततामय व लोकशाही पद्धतीने संपन्न झाली. बुधवारी दि.२९ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही मूल्यांचा आदर्श घालून दिला. शुक्रवारी दि.३१ जुलै रोजी मतमोजणी संपन्न होऊन मतमोजणी नंतर पुढील विद्यार्थी विजयी घोषित करण्यात आले.
प्राथमिक विभाग
(इ.५ वी ते इ.७ वी)
१) आराध्य गोपीनाथ थोरात – इ.६ वी
कु. तनिषा धनंजय आरडे – इ.७ वी
माध्यमिक विभाग
( इ.८ वी ते इ.१० वी)
१) सुमित सागर पाटोळे – इ.१० वी
२) कु. वैष्णवी आश्रुबा सूर्यवंशी – इ.१० वी
उच्च माध्यमिक विभाग
( इ.११ वी–इ.१२ वी )
१) यश दत्ता कांबळे – इ.१२ वी ( विज्ञान )
२) कु. पूजा अर्जुन जाधव – इ.११ वी कला
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शिस्तबद्ध व पारदर्शक वातावरणात पार पडली. मतदान, मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आदर्श अनुभव घेतला. विजयी उमेदवारांचे संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
"जागरूक विद्यार्थी... जबाबदार नेतृत्व... उज्ज्वल भविष्य!" या ब्रीदवाक्याला साजेशी ही निवडणूक विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्ये रुजविणारी ठरली असल्याचे ॲड. समीर मखरे यांनी सांगितले. मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या समता मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरालाल चंदनशिवे यांनी शालेय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

