इंदापूर: रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ (पुणे व रायगड) मधील 'प्रथम क्रमांक' (1st Rank) मिळवणाऱ्या प्रतिष्ठित 'रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रल'च्या वतीने दिला जाणारा मानाचा 'सेवारत्न पुरस्कार २०२६' (Seva Ratna Puraskar 2026) प्रसिद्ध कवी, लेखक तथात सामाजिक कार्यकर्ते श्री. महादेव चव्हाण यांना प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले. शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महादेव चव्हाण यांनी केलेली उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि सामाजिक क्षेत्रातील निस्वार्थ योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'अल्फा बाईट हॉल, इंदापूर' येथे अत्यंत उत्साही व दिमाखदार वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुणे रो. योगेश भिडे (व्होकेशनल डायरेक्टर, डिस्ट्रिक्ट ३१३१), रो. सविता भोर, रो. वसंतराव मालुंजकर (इकोनोमी अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट डायरेक्टर), क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो.ज्ञानदेव डोंबाळे, रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या अध्यक्षा रो. मंदाकिनी डोंबाळे, सचिव रो. हेमलता माळुंजकर आणि निवड समितीचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे यांच्या शुभहस्ते श्री. महादेव चव्हाण यांना सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास सन्माननीय पाहुणे म्हणून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. तुषार रंजनकर आणि वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुभाषचंद्र कराळे उपस्थित होते. महादेव चव्हाण हे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित 'शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रा'चे समन्वयक म्हणून अत्यंत निष्ठेने काम पाहत आहेत. ऊसतोड मजूर आणि वंचित घटकांच्या दारात जाऊन वैद्यकीय मदत पोहोचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आरोग्य सेवेसोबतच संस्थेच्या शैक्षणिक, महिला सबलीकरण, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. सामाजिक सेवेचे व्रत जोपासतानाच महादेव चव्हाण यांनी साहित्यिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. एक अभ्यासू कवी आणि लेखक म्हणून त्यांच्या दर्जेदार साहित्यकृती प्रसिद्ध असून, आपल्या लेखणीतून व कवितांमधून त्यांनी सामाजिक भावना आणि जनसामान्य माणसाच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या आहेत.
त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आणि निस्वार्थ सेवेची दखल घेऊन रोटरी क्लब ऑफ इंदापूर सेंट्रलच्या वतीने त्यांना 'सेवारत्न पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील घटकांची सेवा करणाऱ्या महादेव चव्हाण यांच्या या कार्याचा गौरव करताना उपस्थितांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मध्ये 'प्रथम क्रमांक' पटकवणाऱ्या क्लबकडून मिळालेला हा बहुमान महादेव चव्हाण यांच्या सामाजिक आणि साहित्यिक प्रवासाला अधिक ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव डॉ गिरीश देसाई , खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर , यांच्या प्रेरणेतून शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रचा हा उपक्रम सुरू झाला. ऊसतोड मजुरांसाठी लागणारी औषधे, आणि औषधोपचार यावर होणारा खर्च ट्रस्टच्या माध्यमातून केला जातो आहे. ट्रस्टची ही सेवा कर्मयोगी आणि निरा भिमा या दोन्ही कारखान्याच्या कार्यक्षेत्रा येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्याच्या बांधावर जिथे ऊसतोड चालू आहे येथे ही मोफत आरोग्य तपासणी केली जाते आहे. ही सेवा सहा वर्ष झाली अविरत चालू आहे. शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ही सेवा मला करण्याची संधी मिळाली या बद्दल मी संस्थेचा आभारी आहे. असे श्री. महादेव चव्हाण यांनी म्हणले.

