इंदापूर, डॉ. संदेश शहा
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवार इंदापूर भुसार मार्केटमध्ये जयसिंग चंदनकर यांच्या आडत दुकानावर ज्वारीस प्रति क्विंटल १०५११ रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार भिगवणमध्ये दिपक मचाले यांच्या आडत दुकानावर बाजरी स प्रति क्विंटल ४५०१ रुपये तर गहू साठी प्रति क्विंटल ४५०१ रुपये दराने विक्री झाली. हा राज्यातील विक्रमी दर ठरला असल्याची माहिती बाजार समितीचे मार्गदर्शक तथा जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
यावेळी आडत उदयशेठ शहा, रविंद्र चंकेश्वरा, अनिल भंडारी, रोहित गुळवे, कृष्णल मिसाळ, राहुल देशमुख, नामदेव शिरसट, श्री. कोळेकर व इतर व्यापारी उपस्थित होते. मुख्य बाजार इंदापूर मध्ये मागील सप्ताहात कांद्यास प्रति क्विंटल ५००० रुपये, तर डाळींब ३७१ रुपये, पेरु ९१ रुपये, ड्रॅगन फ्रुट ८१ रुपये, सिताफळ ८० रुपये, संत्रा ६० रुपये, मोसंबी ५५ रुपये प्रति किलो या उच्चांकी दराने विक्री झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप बाळासाहेब पाटील, उपसभापती सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांनी दिली.
इंदापूर बाजार समितीच्या मुख्य व उपबाजार ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालास उच्चांकी बाजारभाव मिळत असून शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्री साठी आणावा. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल शासनाच्या किंवा बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करावा. शासनाचा किंवा बाजार समितीचा खरेदी-विक्री व्यवहाराचा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करु नये, जेणेकरुन शेतकऱ्यांची आर्थिक व इतर फसवणुक होणार नाही. तसेच बाजार समितीने उपलब्ध केलेल्या सोयी-सुविधा व योजनेंचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. असे आवाहन इंदापूर बाजार समितीचे सभापती संदीप पाटील यांनी केले.
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती सौ. रुपालीताई संतोष वाबळे, संचालक तथा माजी आमदार यशवंत(तात्या) माने, माजी सभापती विलासराव माने, दत्तात्रय फडतरे व तुषार जाधव, जेष्ठ संचालक मधुकर भरणे, मनोहर ढुके, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, सौ. मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, सुभाष दिवसे, रोनक बोरा व सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
