या प्रसंगी इंदापूरचे आयुर्वेदाचार्य मल्हारी घाडगे व रविंद्र परबत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध औषधी वनस्पती प्रत्यक्ष दाखवून त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांची आणि मानवी शरीरासाठी असलेल्या फायद्यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
मार्गदर्शनादरम्यान गुळवेल, कोरफड, तुळस, विदारा, पारिजातक, तेजपत्र, कडुनिंब, पानफुटी, पुनर्नवा, शिसम, रुई, पिंपळ आणि कढीपत्ता आदी औषधी वनस्पतींचे विविध आजारांमध्ये होणारे उपयोग, त्यांचे योग्य प्रमाणात सेवन करण्याच्या पद्धती आणि औषधी वापर याविषयी सखोल माहिती देण्यात आली. निसर्गाशी नाते घट्ट राहावे व घरोघरी औषधी वनस्पतींचे संगोपन व्हावे या उदात्त उद्देशाने कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना गुळवेल आणि कोरफडीच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पतंजली योग समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रशांत गिड्डे, अशोक अनपट, काशिनाथ पारेकर, भालचंद्र भोसले, शरद झोळ, रामेश्वर साठे, बिभीषण खबाले आणि हमीद आतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कौतुकास्पद उपक्रमाचे इंदापूर शहरातील नागरिकांकडून व योगसाधकांकडून भरभरून अभिनंदन होत आहे.
