विशेष बातमी : महाराष्ट्रातील खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि अन्य प्रतिकूल घटकांमुळे बाधित झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये 'ट्रीगर-१' लागू झाला असून, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पंचनाम्यांसाठी जीपीएस आणि छायाचित्रांचा वापर
शासनाच्या निर्णयानुसार, बाधित भागातील पिकांची खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शेतांचे जीपीएस कोऑर्डिनेट (GPS Coordinates) आणि पिकांचे छायाचित्रे संकलित करून अहवाल तातडीने शासनाला सादर करण्यास सांगितले आहे.
दुष्काळग्रस्त भागासाठी राज्य शासनाकडून १२ प्रमुख सवलती व उपाययोजना:
दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने खालील १२ महत्त्वाच्या सवलती जाहीर केल्या आहेत:
- जमीन महसूलात सूट: बाधित भागातील जमीन महसूल माफ केला जाईल.
- पीक कर्जाचे पुनर्गठन: शेतकऱ्यांच्या थकीत व चालू पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाईल.
- कर्ज वसुलीस स्थगिती: शेतीशी निगडित सर्व प्रकारच्या कर्जाच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
- वीजबिलात सूट: ७.५ हॉर्सपावरपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट दिली जाईल (७.५ HP पर्यंतच्या पंपांचे बिल आधीच माफ आहे).
- परीक्षा शुल्क माफी: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात पूर्ण माफी मिळेल.
- रोजगार हमी योजना (मनरेगा): रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू केली जातील.
- पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स: आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी तातडीने टँकर्स सुरू केले जातील.
- वीज जोडणी खंडित न करणे: टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अन्नधान्याची सोय: शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी विशेष व्यवस्था केली जाईल.
- चार्याची उपलब्धता: जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून दिला जाईल.
- जलसंधारणाची कामे: जलसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू केली जातील.
- पाण्याचे नियोजन: पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्यासाठी विशेष कृती आराखडा लागू केला जाईल.
विभाग व जिल्ह्यानुसार 'ट्रीगर-१' लागू झालेल्या तालुक्यांची माहिती:
- छत्रपती संभाजीनगर विभाग (एकूण ७९ तालुके):
- छत्रपती संभाजीनगर (९ तालुके): छ. संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री.
- बीड (११ तालुके): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी.
- नांदेड (१४ तालुके): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलुर, किनवट, हिमायतनगर, माहुर, धर्माबाद, उमरी, अर्धापुर, नायगाव.
- लातूर (१० तालुके): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरुरअनंतपाळ, देवणी, जळकोट.
- परभणी (९ तालुके): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी.
- जालना (८ तालुके): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद.
- धाराशिव (८ तालुके): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा.
- हिंगोली (५ तालुके): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत.
- नाशिक विभाग (एकूण ५९ तालुके):
- जळगाव (१५ तालुके): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल.
- अहिल्यानगर (१४ तालुके): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, रहाता.
- नाशिक (१० तालुके): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा.
- नंदुरबार (६ तालुके): अक्कलकुवा, शहादा, नंदूरबार, नवापुर, तळोदा, अक्राणी.
- धुळे (४ तालुके): धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर.
- अमरावती विभाग (एकूण ५६ तालुके):
- यवतमाळ (१६ तालुके): यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी जामणी, केळापुर, घाटंजी, राळेगाव.
- अमरावती (१४ तालुके): अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खं., धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगावसुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदुरबाजार, दर्यापुर.
- बुलढाणा (१३ तालुके): जळगाव जामोद, संग्रामपुर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापुर, मोताळा, नांदुरा.
- अकोला (७ तालुके): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी.
- वाशीम (६ तालुके): वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, मानोरा.
- नागपूर विभाग (एकूण ३९ तालुके):
- नागपूर (१४ तालुके): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर.
- चंद्रपूर (१२ तालुके): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजूरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभिड, सिंदेवाही, पोंभुर्णा.
- वर्धा (७ तालुके): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी.
- भंडारा (३ तालुके): भंडारा, पवनी, लाखंदूर.
- गडचिरोली (२ तालुके): गडचिरोली, चार्मोर्शी.
- गोंदिया (१ तालुका): तिरोडा.
- पुणे विभाग (एकूण २९ तालुके):
- सोलापूर (११ तालुके): उ. सोलापूर, द. सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
- पुणे (८ तालुके): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर.
- सातारा (६ तालुके): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
- सांगली (४ तालुके): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ.
- कोकण विभाग (एकूण २२ तालुके):
- सिंधुदुर्ग (८ तालुके): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला.
- कोल्हापूर (६ तालुके): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड.
- रत्नागिरी (३ तालुके): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर.
- रायगड (१ तालुका): श्रीवर्धन.
शेतकऱ्यांना लवकरच स्वतंत्र मदत जाहीर होणार
शासनाने स्पष्ट केले आहे की, ट्रीगर-१ अंतर्गत समाविष्ट असलेल्या २६५ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी मिळणारी प्रत्यक्ष आर्थिक मदत विहित कार्यपद्धती पूर्ण करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे (GR) जाहीर केली जाईल.


